Skip to main content

Posts

Featured

निरागस मैत्री

 दि:१३:०५:२०२५ आईस्क्रीम कथा स्पर्धेसाठी माझी कथा. शीर्षक:निरागस मैत्री. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली नि घरात पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचे याचा बेत मुले आखत होती. ए आई आपल्याला मामाच्या गावाला कधी जायचे आहे? देवांश तुणतुणे वाजवू लागला. तशी मीना ताई म्हणाली अरे जायचे आहे रे, जरा थांब ना,कालच तर सुट्टी लागली आहे. सर्वजण मामाच्या गावाला जाण्यास आतुर झाले होते. तिकडे मामाच्या घरी ही असेच प्रश्न चालू होते.कधी येणार मीना ताई,देवांश.कारण सर्व भावंडे एकत्र आली की धमाल व्हायची.चिंच,करवंदे,कैऱ्या गोळा करायच्या,त्याच बरोबर थंडगार आईस्क्रीम,बर्फाचा गोळा.आहाहा! काय मज्जाच मजा ! मस्त धमाल करू या. असा बेत प्रत्येकाच्या मनात आखला जात होता. दोन दिवसांनी मामाचा फोन आला.कधी येताय मंडळी इकडे. आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही तयारच आहोत रे मामा ,देवांश पटकन बोलला. हो हो ये बेटा,तुझीच वाट बघतेय सायली, नीतू. त्यांना ही सुट्टीत धमाल करायची आहे.इकडे रानमेवा तयार आहे म्हणून त्याची चव घेण्यासाठी सर्वजण आतुर झालेली आहेत. मामाचा फोन आला नि आईने‌ जायची तयारी केली. बोलता बोलता मावश...

Latest posts

विनोदी पात्र राघव

कविता माहेर

अभिप्राय वाढदिवसाचा.प्रतिभा

लग्नाचा वाढदिवस

गुढी पाडवा, संवाद लेखन

गणपती मोरगाव

देव देवालयी नाही

माझे माहेर

कृष्ण सखा

श्वास माझ्या अंतरीचा