गणपती मोरगाव
दि: २३:०७:२०२०
अष्टविनायक काव्य लेखन
पहिला गणपती
*मोरगावचा मोरेश्वर*
मोरगावचा मोरेश्वरा
वाहन तुझे आहे मोर
डाव्या सोंडेचे महत्व
आहे जगात रे थोर...१!
काळ्या दगडात मंदिर
बाजू मजबूत तटबंदी
चार बाजूला उंच मनोरे
भव्यदिव्य मंदिराची रूंदी...२!
मयूरेश्वराची सुंदर मूर्ती
पूर्वभिमुख नी डोळ्यात हिरा
मस्तकी नागराज फणा
दर्शनाने मिळतो आनंद खरा...३!
डाव्यासोंडेची महत्व फार
मोरया गोसाव्याचे जन्मस्थान
कऱ्हानदीच्या काठी गाव
अष्टविनायकात पहिला मान...४!
सौ. प्रतिभा विभूते,
पुणे.
Comments
Post a Comment