माझे माहेर

माहेर पंढरी
अभंग( ८ /८ )

माझे माहेर हो पंढरी
कशी करू आता वारी||१||

माय माझीच रूक्मीनी
दिसते  किती देखणी ||२||

बाप विठ्ठल सावळा
संगे असे भक्त मेळा||३||

माझ्या माहेराची ख्याती
सारे भक्तगण गाती||४||

आस लागली भेटीची
माहेराला हो जाण्याची ||५||

नको पाहू आता अंत
घडो सहवास संत ||६||

लीन व्हावे पायथ्याशी
जागा द्यावी चरणाशी||७||

✍सौ. प्रतिभा विभूते,
         पुणे.

Comments