श्वास माझ्या अंतरीचा

दि: १७:०६:२०२०
ओळकाव्य:
श्वास माझ्या अंतरीचा

गर्भात तुझी चाहूल
गेले मनी मोहरून
जन्मदिनी तुझ्या बाळा
मन गेले बहरून

श्वास माझ्या अंतरीचा
तुजसम एकरूप
बाळलीला पाहताना
येई मनाला हुरूप

अंगणात दुडूदुडू
कान्हा दिसतो सुंदर
जसा गोकुळी खेळतो
घर वाटते मंदिर

तुझ्या येण्याने झाले रे
जीवन माझे कृतार्थ
अनमोल रत्न पोटी
आयुष्याला आला अर्थ

मिळे पदवी जगात
सर्व श्रेष्ठ असे माता
श्वास माझा अंतरीचा
सुगंधित झाला आता

✍सौ. प्रतिभा विभूते,
           पुणे.

Comments