लग्नाचा वाढदिवस
काव्य रचना अष्टाक्षरी.
माझी लाडकी बहिण व जीजू,
डाॅ. हरीश व डाॅ. वैशाली यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही सुंदर भेट
शीर्षक: *बंध असे रेशमाचे*
सप्तपदी चालताना
हात हातात गुंफले
बंध असे रेशमाचे
नवे नात्यात जुळले..१!
शुभदिन तो भाग्याचा
पाया असे विश्वासाचा
सुखी संसारात हर्ष
लग्न वाढदिवसाचा..२!
वाट असे ती बिकट
साथ मिळो तुझी सदा
छाया प्रेमळ मिळता
सोडू नकोस रे कदा..३!
वेल नात्याची गुंफण
रंग संगती जुळली
श्वास एकरूप झाला
साथ सख्याची मिळाली..४!
सातजन्म बरोबर
ओढ प्रितीची वाढते
संसाराचे प्रीतफुल
तुज सवे मी खुलते..५!
✍सौ. प्रतिभा विभूते
पुणे.©®
Comments
Post a Comment