कविता माहेर



विषय: माहेर

आली आली दिवाळी
ओढ लागते माहेराची
जमतील सख्या साऱ्या
बहिण,भाऊ भेटीची

मन घेई धाव सदा
माहेराच्या अंगणात
भातुकलीचा मांडला
खेळ किती आनंदात

माहेरच्या आठवणी
ठेवू हृदयाच्या कप्प्यात
देई सदैव आनंद
राहू आठवून सुखात

चार दिन विसाव्याचे 
ठिकाण माहेर बाई
किती प्रेमाने करतात
आठवण ताई नी आई

नको मला साडी चोळी
दादा साथ द्या संकटात
आले चार दिवस माहेरी
राहू दोघे रे आनंदात

सौ. प्रतिभा विभूते,
      पुणे.

Comments