देव देवालयी नाही

दि: १९:०६:२०२०
आजचा उपक्रम

*देव*
अष्टाक्षरी काव्य.

देव नाही देवालयी
देव असे ह्रदयात
अंतरीचे भाव जाण
दिसे तेथे आनंदात ...१!

अरे माणसा माणसा
आता मनास विचारी
देव डॉक्टर,पोलीस
सेवेकरी,कर्मचारी...२!

भुकेलेल्या जीवाला दे
दोन घास अन्नपाणी
तृप्त कर गरीबांना
मुखी बोल गोड वाणी...३!

कर सेवा तू वृध्दांची
वरदान मिळे छान
सुखी होईल जीवन
आई वडिलांना मान...४

दीन दुबळ्यां मदत
समाधान ते मानावे
होई कल्याण तुझे रे
देव दिनात जाणावे...५!

ठेवा मनी माया प्रेम
देव दिसेल निस्वार्थ 
शुध्द असू दे विचार
येई जीवनाला अर्थ...६!

✍सौ. प्रतिभा विभूते
         पुणे.

Comments