कृष्ण सखा
दि: १२:०६:२०२०
भक्ती काव्य
*कृष्ण सखा*
कृष्ण सखा माझा,कुठे गेला हरी
शोधून थकले,आले बाई घरी||धृ||
रात्रंदिन लागे,तुझाच रे ध्यास
कधी भेटशील,सख्या तुझी आस
कासावीस जीव,होतो माझ्या
उरी
शोधून थकले,आले बाई घरी||१||
मन मंदिरात,असे तुझी मूर्ती
राधाकृष्ण सखा,जगामध्ये किर्ती
नको ठेवू कान्हा,मजसी रे दूरी
शोधून थकले,आले बाई घरी||२||
येई प्राण कंठा,किती वाट पाहू
तुझ्या प्रेमरंगी, रंगून मी जाऊ
अंतकाळी कान्हा, धाव रे सत्वरी
शोधून थकले,आले बाई घरी||३||
✍सौ. प्रतिभा विभूते,
पुणे.
Comments
Post a Comment