सौ. प्रतिभा विभूते. वाढदिवसाच्या शुभेच्छा! स्पर्धा.
ललीता वसाके प्रणिती दशाक्षरी: *!!स्पर्धा!!!स्पर्धा!!!स्पर्धा!!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*प्रणिती दशाक्षरी काव्यसमूह आयोजित*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
*कवयित्री प्रतिभाताई विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा*
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*दिनांक:-१४/०६/२०२०*
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*वेळ:-सकाळी ८:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत*
🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍
*विषय: - जीवनसाथी*
👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥
*परीक्षक निकालाच्या दिवशी कळेल.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*प्रणिती दशाक्षरी काव्य*
*-:नियम:-*
*१)प्रणिती दशाक्षरी काव्य तीन कडव्यांचे असावे.*
*२)प्रत्येक ओळीत दहा अक्षरे घ्यावीत.*
*३)तिसर्या व पाचव्या ओळीत यमक साधावा.*
*४)प्रत्येक ओळ लयीत असावी.*
*५)काव्य आशययुक्त असावे.*
*६)विषयाची ओळ रचनेत आली पाहिजे.*
*७)पहिल्या कडव्याचा आशय दुसऱ्या कडव्यात यायला हवे आणि तिसऱ्या कडव्याची समाप्ती ही दोन कडव्यांच्या आशयातून झाली पाहिजे.*
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
*टीप:-१)वेळेच्या आधी किंवा वेळेनंतर येणारे प्रणिती दशाक्षरी काव्य स्पर्धेत घेतले जाणार नाही.*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*-:समूह प्रशासक:-*
*प्रणाली कदम*
*-:समूह संचालक:-*
*संगीता माने*
*संकलन/ग्राफिक्स*
*ललिता वसाके*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
: स्पर्धेसाठी
प्रणिती दशाक्षरी काव्य समूह आयोजित
विषय- जीवन साथी
असताना मी अल्लड बाला
झाले आज सौभाग्यकांक्षिणी
जीवनसाथी तुम्ही मिळाले
गुंतले नाते दोन जीवांचे
जीवाशिवाचे मिलन झाले
जडली प्रीत तुजवरती
अनावर माझ्या या भावना
पावन झाले माझे जीवन
कसे विसरू साथ तुझी रे
दिलेस मला तू संजीवन
बागेत फिरता सायंकाळी
रोम रोम हे हर्षित झाले
स्वप्नांच्या झुल्यावर झुलले
हृदयाचे स्पंदन होताच
या कळीचे फूल उमलले
सौ.भारती सावंत
मुंबई.
***********************
जीवनसाथी
जपू -हदयी आपलेपणा
नात्याला समजून घेणारा
जीवनसाथी लाख मोलाचा,
समजून उमजून राहू
एकनिष्ठतेच्या जीवनाचा.
सुखी संसाराच्या वेलीवर
जीवनसाथीने बहरली
अन उमलली फुले छान,
संस्कारांनी पिढी घडवूया
सदोदित करुया वंदन.
सुख दुखात सामिल व्हावे
एका रथाची ही दोन चाके
मिळे अखंड साथ जीवना,
जीवनसाथी आहे सर्वस्व
सुखाच्या संसाराची प्रार्थना.
दिनकर श्री पाटील
खोची जि कोल्हापूर.
***********************
*दशाक्षरी पाचोळी रचना
(स्पर्धेसाठी)*
*************************
*विषय --- जीवनसाथी*
**************************
*सप्तपदीचे घेऊन फेरे*
*हात माझा दिला तुझ्या हाती*
*नाते जुळले युगायुगाचे,*.......
*सुखदुःखाचे क्षण झेलण्या*
*जीवनसाथी एकमेकांचे.*.......
*जीवन हिंदोळ्यावर सख्या*
*तुजसवे नाहले सौख्यात*
*प्रेमगीत छान बहरले,*.....
*शब्द तुझे सूर माझे असे*
*जीवनगाणे नवे स्फुरले.* .....
*चालताना ही जीवनवाट*
*निस्वार्थ प्रीती अलवार*
*अंतरात अजूनही जपते ,* .....
*जीवनसाथी अखंड राहो*
*ईशचरणी हेच मागते.*.......
*मीना सानप , बीड*
*************************
स्पर्धेसाठी.
*विषय --- जीवनसाथी*
**************************
जीवन साथी खुण प्रेमाची
चिंब चिंब या मनी भिजून
अंतरी इमली खट्टी-मिठी
प्रेम आहे हे मनात तरी
प्रेयसीचे शब्द नाही ओठी
जन्माजन्माचे नाते अपुले ,
सप्तरंग स्वप्नात सोबती
वाटे हा सवगंडी लाभावा
धुंदीत प्रित मनी रंगावा
तुझ्याच साथीने धुंद व्हावा
जीवनसाथीचा डौल पाही
हिरव्या मनी प्रिती प्रवाही
सौभाग्य लेणं लावीते माथी
म्हातारपणी देवा ग माझ्या
माझा धनी राहू दे रे साथी.
सुरेंद्र य. पाटील , ठाणे
****************************
प्रणिती दशाक्षरी काव्य
समुह आयोजित दशाक्षरी काव्य
स्पर्धा स्पर्धेसाठी
विषय जीवन साथी
14.6.2020
जीवन साथी सह जगणे..
जगण्यात तृप्तता असणे..
उन्मादाची उत्कट लहर..
तो सुखाचा बहर बहर..
आठवण तीच हळू वार..1
प्रीतीत जगावा क्षणोक्षण..
क्षणांची तरल आठवण..
भविष्यातील आशा किरण..
जीवाची होईल घालमेल..
जीवन साथी सह स्मरण..2
देवाने दिलेले हे जीवन..
जन्म दिन तो मंगल दिन..
दीर्घायुष्य मिळो वरदान..
उदंड आयुष्य ही शुभेच्छा..
मनःपूर्वक अभिनंदन..3
सौ जयश्री बापट पुणे
***********************
प्रणिती दशाक्षरी काव्य
दशाक्षरी काव्य स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय:जीवन साथी
14.6.2020
जीवन साथी सह जगणे..
जगण्यात तृप्तता असणे..
उन्मादाची उत्कट लहर..
तो सुखाचा बहर बहर..
आठवण तीच हळू वार..1
प्रीतीत जगावा क्षणोक्षण..
क्षणांची तरल आठवण..
भविष्यातील आशा किरण..
जीवाची होईल घालमेल..
जीवन साथी सह स्मरण..2
देवाने दिलेले हे जीवन..
जन्म दिन तो मंगल दिन..
दीर्घायुष्य मिळो वरदान..
उदंड आयुष्य ही शुभेच्छा..
मनःपूर्वक अभिनंदन..3
सौ जयश्री बापट पुणे
*************************
स्पर्धेसाठी
विषय - जीवनसाथी
जीवनसाथी झालीस सखे
सुख शांती समृद्धी घेऊन
जीवनी आली लक्ष्मी पाऊला
खंबीर साथ दिलीस जशी
सीतेच्या मनी राम व्यापला...१
मुखावरील दिव्य तेजाने
सहवास तुझा मज प्रीय
सखे जीव तुझ्यात रंगला
आकंठ प्रेमात भिजवूनी
संसाराचा बाग फुलविला...२
निसरड्या संसारी क्षणात
पती पत्नीचा हा चक्ररथ
कधी कुठे ना अडखळला
अडचणीत स्वकर्तृत्वाने
संकटांचा सेतू पार केला...३
अशोक वरूडे
संगमनेर.
****************************
स्पर्धेकरिता
विषय:जीवनसाथी
तूच तर आहे सखा माझा
तुझ्यामुळे मिळाले जीवन
तूच आहेस जीवणसाथी
तूझ्या लावले आहे हाताने
चंद्रासमान माझ्याच माथी
तुझ्या श्रंगाराने माखले मी
तुझ्या प्रेमाने मोहले रूप
हि आहे तुझ्या प्रेमाची ख्याती
तुझ्या साथीने आली माझ्या रे
या जीवनाला चांगली गती
घर नाही स्वर्गच आहे हा
तुझा माझा संसार चालला
सुख समृद्धीने जीवनात
आनंदी-आनंद पसरला
अगदी दूर आसमंतात
रत्नमाला श्रंगारे.
परभणी.
*************************
स्पर्धेकरिता
विषय: जीवंसाथी
तुझ्यावरच मी किती प्रेम करते
पुस्तका तुलाच मी मनातून
माणले ना रे माझे जीवन साथी
तू तुझेच बोल असतातना रे
पुस्तका तासनतास माझ्या ओठी
माझ्या मंदिरी तुझीच पूजा करते
तुलाच मी बघते ना रे आणि
तुलाच वाचते मी पूर्ण दिवस
शब्द-शब्द ओळ-ओळ पॅरेग्राफ
तुझ्यामध्येले वाचते मी जागून रात्री
तुलाच मी सर्वस्व माझे समजते
उठले की तुला बघते दिवसभर तुलाच बघते
तुझ्यातल्या सर्व रचना वाचून काढते
त्या रचना प्रमाणे मी माझ्या मनातील
रचना लिहिण्याचा मी प्रयत्न करते.
अनोमा मालसमींदर.
परभणी.
इयत्ता चौथी.
**************************"
स्पर्धेसाठी
विषय. जीवनसाथी
बेरंग जीवन जगताना
तिने जीवनी रंग घातला
विपरीत मन हे जुळले
दोन श्वास एकत्र येऊन
अतूट जीवनसाथी झाले
जीवनाच्या रंगमंचावर
आपण दोघेच कलाकार
जीवनाची नवी सुरूवात
येतील कष्ट राहू खंबीर
काळोख्या नंतरच प्रभात
साथ हवी आहे तुझी मला
बांधूया दोघं प्रीतमहाल
प्रेमाने जीवन सजवूया
प्रीतमहालात दोघं राहून
दोघं जीवनसाथी होऊया
आनंद चोपडे
बेळगाव.
***************************
🚩स्पर्धेसाठी कविता 🚩
==================
प्रणिती दशाक्षरी काव्य समूह आयोजित
===================
विषय =जीवनसाथी
====================
🌹शीर्षक =तूच माझी जीवनसाथी 🌹
=====================
तूच माझी जीवनसाथी गं,
सखे तू अशीच उभी रहा,
तुला डोळेभरून पाहू दे.
पुन्हा तुझ्या प्रेम वर्षावात,
मला मनसोक्त गं न्हाऊ दे.
निसर्ग सुद्धा इशारा करी,
आतातरी भेटायला हवं,
या एकांतपणी मी आणि तू.
आपल्यासाठी आला आहे गं,
दाहीदिशा नवा प्रेमऋतू.
माझे हृदय स्वामिनी, साजणे,
असं कुठवर रुसायचे?
आता गाली गोड हसायचे.
सारा गैरसमज काढून,
एकमेकां मनी बसायचे......
==================
🖋श्री. संदीप विठ्ठल जगताप,
आसनगाव, ता. शहापूर, जि. ठाणे.
****************************
स्पर्धेसाठी.
आजचा उपक्रम
विषय :-- जीवन साथी
तुच माझी गं जीवन साथी
सखी साजणी मनमोहनी
अर्धांगिनी रुक्मिणी शोभली
सप्तपदी घालून आलीस
माझ्या घरी लक्ष्मीच्या पाऊली...
तुझी साथ मला जन्मोंजन्मी
मिळावी हेच मागणे माझे
साजणी आहे ईश्वरचरणी
नक्षत्रावानी देखणे रूप
पाहून वाटे ईश्वरकरणी
या जन्मी मिळाली तुझी साथ
आयुष्यभर केली सोबत
संसार माझा झाला सुखाचा
नाही दु:खाचा लवलेशही
आभार मानतो परेशाचा...
सौ.निर्मला कुलकर्णी
सोलापूर
प्रतिभा ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐💐💐🍰🎂🍫🌹
Subject: प्रणिती दशाक्षरी पाचोळी काव्यरचना
स्पर्धेसाठी :—विषय=जीवन साथी
——————————————————————जीवन साथी तुझीच सख्या
प्रेमात तव तृप्त नहाते
बावरुन सदा मोहरते
साथ लाभली तुझीच मला
साज श्रृंगारांनी मी नटते ॥१॥
सुख समृध्दी ही जीवनात
संसारी आनंदी आनंद रे
तुझ्याच साथीने सौख्य नवे
समृध्दतेने हे नटलेले
ईंद्रधनुषी ते स्वप्न हवे ॥२॥
असेच लाभो वरदानते
सदोदीतच फुलवणारे
प्रितीचे हे क्षण अन क्षण
स्वकतृत्वाने झळकणारा
हेवा करिती सर्वच जण ॥३॥
———————————————————————सौ.वीणा विद्याविलास पाठक.
नाशिक.
*****************************
स्पर्धा स्पर्धा स्पर्धा
प्रणिती दशाक्षरी काव्यसमूह आयोजित
राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा
दि.१४/०६/२०२०
स्पर्धेसाठी
विषय:-जीवनसाथी
जीवनसाथी दिवा व वाती
संसार सुखाचा करी छान
गुजगोष्टी ऐके कानामध्ये
गोड बोल मधाळ पाहून
सारे विसरे पाहण्यामध्ये.१
मुले-मुली गोंडस असते
वेलीवरचे सुंदर फुले
प्रेमाने मीठीत घेऊनीया
स्वप्न नगरीत राहणारे
जीवनसाथी रे देऊनीया .२
हातात हात घालून बसू
निवांत छान गप्पा मारत
क्षण सुखाचे आले पाहून
गीत ओठांवर येता कसे
मन भावूक झाले राहून.३
रेखा बावा,शहादा.
**************************
*स्पर्धेसाठी दशाक्षरी काव्य*
*विषय - जीवनसाथी*
हातात हात घेऊन तुझ्या
चालले मी प्रिया सप्तपदी
अन् जुळल्या रेशीमगाठी
आयुष्यभर असावी साथ
जीवन सारे तुझ्याच साठी
जीवनसाथी तू असताना
वाटे न मज कसली भीती
उभा आहेस खंबीरपणे
संसार रथ पुढे चालता
जुळली आपली दोन मने
तुझ्यामुळेच मिळाली मला
मातृत्वाची ही सुंदर भेट
जीवनाचे झाले रे सार्थक
जीवनसाथी तुझ्यासारखा
चिंता साऱ्या मग निरर्थक
सौ. प्राची मेतकर, ठाणे.
*****************************
प्रणिती दशाक्षरी काव्यसमूह आयोजित
राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा
दि.१४/०६/२०२०
स्पर्धेसाठी
विषय:-जीवनसाथी
जीवनसाथी आहेस सख्या
तुझे नी माझे नाते युगांचे
प्रेमाचा आपला सहवास
सतत अशीच राहो साथ
माझ्या मनात तुझाच वास...१
संसार रथाची चाके दोन
मिळून करू संकटे पार
माझा तुझ्यावर हा विश्वास
सावली राजा तुझी असे मी
सदा तुझ्याच सुखाचा ध्यास...२
संसाराचा गाडा हाकताना
कष्ट आपण अपार घेऊ
मिळून करू स्वप्नं साकार
अशक्य ही होई मग शक्य
तुझ्या मुळे जीवना आकार...३
उज्वला कोरडे
*************************
स्पर्धेसाठी ..दशाक्षरी..
काव्य..जीवन साथी
जीवनसाथी
**********************
सप्तपदी करुन आली मी
सखया तुझ्याच आयुष्यात
जीवनसाथी बनण्यासाठी
स्विकारावे मनस्वी मजला
तुझीच सेवा करण्यासाठी
मायेचे बंधन सोडूनिया
प्रेमबंधणी मी बांधलेली
तुझी झाली मी पट्टराणी
जाऊ नकोस सोडून मज
सदा पाजीन प्रेमाने पाणी
संसार करु आनंदान रे
साथसंगतीत राहू सदा
जणू राधाकृष्णाची ही जोडी
एकी टिकवून रहायचे
जपून परस्परांशी गोडी
विनायक धानोरकर, गडचिरोली
**************************
-*स्पर्धेसाठी*
*विषय -- जीवनसाथी*
होते अल्लड बावरी मी रे
अचानक आलास जीवनी
भेट आपली अशीच झाली
घेतला अंदाज स्वभावाचा
मागणी एकमेकास चाली
चालले सप्तपदी मंडपी
देवूनी हातात हात तुझ्या
अग्नी नी ब्राह्मणांच्या साक्षीने
दिल्या घेतल्या आणाभाका या
झालो जीवनसाथी खुषीने
माप धान्याचे लवंडून मी
प्रवेश केला नव्या घरात
आनंद बहरला सासरी
सोडून मायबाप माझे रे
आले हर्षून तुझ्या आसरी
सौ नलिनी पवार,पुणे
दिनांक -- १४/०६/२०२०
***************************
*प्रणिती दशाक्षरी काव्यसमुह आयोजित*
*राज्यस्तरीय दशाक्षरी काव्यस्पर्धा*
*दि .१४ / ०६ / २०२०*
*स्पर्धेसाठी*
*विषय : - जीवनसाथी*
जुळुन आल्या रेशीमगाठी
मिळाला तुच जीवनसाथी
दिले सौभाग्याचे वरदान
सुखी संसाराची स्वप्न उरी
दिला मज घरात सन्मान....१
तुच आयुष्याचा जोडीदार
तुझ्या मिठीतले सुख न्यारे
खुलते माझी गुलाब कळी
तुझ्याविना नाही मन माझे
दिसतो तु मज जळीस्थळी...२
सरळ, साधा ,निर्मळ भाव
जखमेवर घाली फुंकार
जणू भासतो तू प्रेमवीर
सुख - दुःखाच्या प्रत्येक क्षणी
वाटतो सगळ्यांना आधार...३
*श्री . बाळू भाऊसाहेब नेहे*
*अंबरनाथ , ठाणे.
*****************************
प्रणिती दशाक्षरी काव्य समुह आयोजित राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा.....
स्पर्धेसाठी
विषय....... *जीवनसाथी*
तेजस्वीनी तू प्रतीभावंत
जीवनसाथी मला लाभली
जीवनात नदीच प्रेमाची
वाटे जणु वहात राहीली
झाली तू संगीनी आयुष्याची .....
सुख शांती घेऊनी आलीस
नावाची तू प्रतिभा काव्यात
सहजच गुंफून गेलीस
मना मनात सर्वांच्या तुझे
नाव कोरून तू ठेवलीस......
जीवनी सौख्य सारे मिळाले
संसार कसा छान फुलला
मना सारखे मिळत गेले
गोजीरवाणी मुलं लाभली
द्रुष्ट ना लागो ह्या संसाराला.....
सौ.वीणा पाटील कोल्हापूर
***********************
स्पर्धेसाठी
विषय --जीवनसाथी
काळ खरा हा जीवनसाथी
चक्र फिरे ते जगाभोवती
जिवासोबती माया असते
नातीगोती सर्व ठरविते
माझे माझे करीत बसते
जीवनसाथी खरा पाहिजे
तर तो देवामध्येच शोधा
बंधू भगिनी व्यर्थ पसारा
मोह आवरा पत्नी मुलांचा
जन्म मृत्यूला नकोच थारा
वास्तव्या घर भगवंताचे
सौख्य शांतता सदैव तेथे
जीवनसाथी कृष्णकन्हैया
मन मोहरते आनंदाने
नकोच दुसरी सुखशैया
किरण जोगळेकर, कल्याण.
**************************
*"स्पर्धेकरीता सादर"*
*विषय :- जीवनसाथी*.
*शीर्षक:- थेंब थेंब आटवी रक्ताचा*
तारुण्याच्या उंबरठ्यावर
पत्नी लाभते जीवनसाथी
सुख दुःखातली वाटेकरी,
चालवीण्या संसार रथाला
सदा संस्काराच्या मार्गावरी(१)
वादळ वारे कितीही येवो
झेलुनी धैर्याने छातीवर
विचार मुलांच्या भविष्याचा,
उचित शिक्षण देण्यासाठी
थेंब थेंब आटवी रक्ताचा (२)
म्हातारपणी परस्परांची
आधारकाठीही तेच होती
स्वत:साठी काही न मागुनी,
फक्त लेकरांच्या सौख्यासाठी
ईश्वरास करी विनवनी (३)
रविंद्र गिमोणकर, नागपूर.
***********************
प्रणिती दशाक्षरी समूह
स्पर्धेसाठी
विषय = जीवनसाथी
जीवनसाथी
प्रेम, स्नेहाची जीवनसाथी
सुख, दुखातही सोबतीला
निभावती खरा तो संसार
कष्ट, श्रम, करी सर्वकाळ
घराचा करतेस उद्धार
जाण जाणे नित्य भावनांची
उदार व्यक्तिमत्व शोभते
त्याग, समर्पण जीवनाला
मुलं,माता,पित्यांची काळजी
लढती सार्थ क्षणोक्षणाला
प्रेमाची खाण, दायित्व जाण
काळजात भरे ममतेने
अर्थपूर्ण जीवन झिजते
कुटूंब आधार ही मोलाचा
कर्म, धर्म, सारे शिकवते
दत्तात्रय धिवरे
शिंदखेडा ता. शिंदखेडा,
धुळे
**************************
प्रणिती दशाक्षरी काव्यसमूह आयोजित
राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा
दि.१४/०६/२०२०
स्पर्धेसाठी
*विषय:-जीवनसाथी*
*काय पाहिलंस माझ्यात तू*
**********************
जीवनाच्या वळणावरती
बनला शेवटचा श्वास तू
सख्या माझ्यात काय पाहिले,
जीवनसाथी म्हणूनी मला
जन्मोजन्मीचे प्रेम वाहिले
.
सतत प्रचिती मज आली
यश तुझे होते,तुझ्यासाठी
माझ्यापेक्षा किती बहुमोल,
काय पाहिलस माझ्यात तू
ठरवले मज अनमोल.
काय पाहिले माझ्यात असे
लावली सोबतीची आस तू
केले मजसाठी समर्पण,
देते वचन तुजसाठीच
करेन मी जीवन अर्पण.
**********************
सौ. कोठेकर योगिता संजय
निगडी पुणे.
***************************
प्रणिती दशाक्षरी काव्य समुह आयोजित राज्यस्तरीय दशाक्षरी काव्य स्पर्धा.....
स्पर्धेसाठी
विषय....... *जीवनसाथी*
विश्वासाने पाऊल टाकू या ,
हातात धरूनी घट्ट हात,
चालूया सुख स्वप्नांची वाट,
अंतर नसावे रे मनात,
जरी अवघड वाटेल घाट... १
संसार रथाची दोन चाके,
देऊ या एकमेका साथ,
गाडी हाकू आपण जोडीने। .
चढ-उतार आले जीवनी,
सोडवू या आपण गोडीने... २
जीवनसाथी दुःख झेलसी,
सुखवे तुझा प्रेमळ भाव,
प्रितीगंधाचा जीवन वारा,
कशी आवरू सांग मनाला,
स्मृतींनी आला अंगी शहारा।।
सौ स्वाती मकरंद टण्णू
कोथरूड, पुणे.
**********************
,प्रणिती..दशाक्षरी..स्पर्धा..
जीवनसाथी..
🌱🌿🌱🌿🌱
तुझं,माझं नातं असं छान..
फुलत गेलं मना मनात..
प्रेमाच्या साथीत ते जगणं..
तुझ्या सहवासात म्हणजे...
प्रेमस्वरुप होऊन जाणं..।।१।।
🌱🌿🌱🌿🌱
..........................
तुझं अस्तित्व पाऊसधारा..
जणू पगोळ्यांच असे गीत..
मनाला जाणवतो ओलावा..
त्या गीतात तुला रे पाहून..
कसं जगावं मिळे सांगावा..।।२।।
🌱🌿🌱🌿🌱
.............................,
वेडी,गोड प्रित आपली ती..
जीवनसाथी तू असे माझा..
माझं मन उमलतं जातं..
तुझ्याचं त्या सानिध्यात माझं..
मनातलं गीत गोड गातं....
🌱🌿🌱🌿🌱
........................
©सौ.मेधा तेलंग
पुणे.
************************
प्रणिति काव्यसमुह
दक्षाक्षरी आयोजित
स्पर्थेसाठी
जीवन साथी
आशारुपी संसाराचा रथ
बनली चाके तुच अन् मी
कर्म म्हणे सारथ्याला चल.....
परमेश्वर अश्व बनूनी
देऊ साथ नको मनी सल......
जीवनसाथी तु सखा माझा
बनूनी गृहलक्ष्मी मी तुझी
अग्निपरिक्षा सहन करे......
प्रेमरथ चालला डौलाने
यात्री बसे त्यावरी लेकरे .....
काळरुपी दगड आडवा
वाचवू पाहे ही साथ मला
प्रयत्नांचे छत्र मदतीला....
दे हाथ हाती गाठून ध्येय
चल जाऊ ये निजधामाला....
सौ.शुभांगी विसपुते
***********************
प्रणिती दशाक्षरी काव्य
समुह आयोजित
स्पर्धेसाठी
विषय : जीवनसाथी
शिर्षक : शतायुष
असा असावा तसा नसावा
स्वप्न पाहावी मोठ मोठाली
आस धरून पुढे चालावे,
परीकथेतल्या परीवाणी
शतायुष आपणा लाभावे.
मनासारखा जीवनसाथी
शोध तसाच घेतला जातो
स्वप्न उराशी बाळगल्याने,
आयुष्याच्या वळणावरती
जीवन सुखी तडजोडीने.
एकमेका सहाय्य करूनी
जपणूक करावी नात्यांची
जीवन जगावे उल्हासाचे,
कुटुंबासह मौज करावी
जीवनसाथी सुख दुःखाचे.
अशोक बी कांबळे, मुंबई
*************************
१४.०६.२०२०
प्रणिती दशाक्षरी समूह
आयोजित स्पर्धेसाठी
जीवनसाथी
सप्तपदी चालुनिया झाले
सात जन्माचे जीवनसाथी
सुख दुःख वाटूनिया घेऊ.
रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या
जीवननौका तरूनी जाऊ.
जीवनसाथी तू जोडीदार
आनंद देई क्षणक्षणाला.
दिलसे घराला घरपण .
त्याग सेवाभाव जन्मभर
केले माझ्यासाठी समर्पण.
जन्भर तू जीवनसाथी
जीवनवाट चालत जाता
दिलीस साथ लाख मोलाची.
सुखच भेटले चालतांना
चाके दोन्ही संसाररथाची.
कुसूम चौधरी दोंडाई .
***********************
प्रणिती दशाक्षरी समूह
स्पर्धेसाठी
विषय-जीवनसाथी
दोन जीवांची ती लग्नगाठ
सप्तपदीच्या घेवुन फेर्या
सौभाग्य लागते तीच्या माथी
लक्ष्मीच्या पावलांनी ते येणे
लाभते पत्नी जीवनसाथी.
आयुष्याचा जीवनप्रवास
अनुभवाने भरलेला हा
सोबत सुख दुखा:त साथ
येता संकटाचा तो प्रसंग
निर्धाराने करतील मात.
मुलं बाळ घडण्यासाठी ते
करती प्रयत्नांची ती शर्थ
संघर्षात घेती हात हाती
साथी सोबत जीवनगाणे
यशस्वी ठरे जीवनसाथी.
स्वप्नील अ बाविस्कर
नांद्रा, पाचोरा जि जळगांव.
************************
दि-१४/०६/२०२०
ऋणानुबंधानी बध्द जीव
बंध जुळती मनामनाचे
रक्ताची आणि मैत्रीची नाती
गतजन्मीचे ऋण फेडण्या
जन्माने प्रत्येका लाभती
सप्तपदीचे फेरे घेऊन
येते उंबरा ओलांडून ती
सासरचीच होऊनी जाते
मातृत्वाचे लेणे लाभताच
मनी आनंदून जाते
जीवनसाथी परस्परांचे
अनोखे असते हे नाते
साथ मिळते सुखदुःखात
एकमेकांची सावली जणू
संकटावर करती मात
प्राची प्रकाश देशपांडे
क़ँलिफौरनिया.
************************
*स्पर्धेसाठी पाचोळी
*जीवनसाथी*
***************
तू भेटला मज आयुष्यात
माझा जीवनसाथी बनून
झाले मी या जन्मी सख्या धन्य
तुझ्या विना जीवनात सारे
आहे सख्या नगण्य व शून्य.......
एकमेकांच्या सहवासाने
जुळले तुझ्या माझ्या मनाचे
न तुटणारे रेशीम बंध
असेच नित्य दरवळावे
तुझ्या नी माझ्या प्रेमाचे गंध.......
आयुष्याच्या या वळणावर
सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी
देऊ एक दुसऱ्याला हात
आलेल्या संकटावर करू
दोघे मिळून न भीता मात........
*सुषमा गंगुलवार* ✍🏻
नांदेड.
*************************
विषय:- जीवनसाथी
अल्लडशी अवखळ बाला
लग्नाचा अर्थ कळत नसे
आशिर्वाद तो थोरामोठ्यांच्या
हात हातात घेऊनीया रे
केला प्रारंभ तो संसाराचा.
लाभे सुंदर जीवनसाथी
प्रीत आपूली खुलूनी आली
मज प्रती दाविला विश्वास
जाहलास कधी नकळत
सख्या माझ्या जीवनाचा श्र्वास.
फुले उमलली वेलीवर
हरपली ओढ माहेरची
प्रेमाचा हिंदोळा असा झुले
शतजन्मांची गाठ बांधली
सोबतीने चालते पाऊले.
*अनघा कुलकर्णी.*
*पुणे
*************************
स्पर्धेसाठी
विषय : जीवनसाथी
जीवनसाथी ताई मिळाली
मला या जीवनात ही सखी
खूप गोड गोड स्वभावाची
आहे देखणी अन् बोलकी
भावना मनात वात्सल्याची....
नात आपल जगावेगळं
नित्य आपण जपत राहू
हास्य अन् आनंद सारे
तुझ्या जीवनातच यावे
अन् हर्षाचे वहावे वारे......
फुलपाखरसम राहणे
आनंद घेत तू जीवनाचा
सदा सर्वदा हास्य फुलावे
तुझ्या या सुंदर चेहऱ्यात
तुला पाहून दुःख पळावे......
स्वप्ना चौधरी चाळीस गाव
**************************
*स्पर्धेसाठी*
*प्रणिती दशाक्षरी काव्यसमुह आयोजित*
*भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धा*
विषय- *जीवनसाथी*
शिर्षक- *लाभावी साथ जीवनभर*
*असा निवडा जीवनसाथी*
*ज्याच्या साथीने कराल क्रांती*
*घेऊनी उद्धाराची शपथ*
*करावी धैर्याने वाटचाल*
*हासिल कराल यशोपथ ...१...*
*मिळावी खंबीरतेने साथ*
*नको पडाया पाऊल मागे*
*सोडावे विरोधातले कोडे*
*असा सुकर करावा मार्ग*
*सदैव टाका पाऊल पुढे*
*असा निर्मावा भुवनी स्वर्ग ...२...*
*राजाराणीचा संसार फुलो*
*असाव्यात सर्वच सुविधा*
*सहवासात वाढावी खुशी*
*पूर्ण करावा दिलेला वादा*
*सुख नांदावे दरदिवशी ...३...*
©®श्री नितीन झुंबरलाल खंडागळे
अंबरनाथ जि. ठाणे
**************************
प्रणिती दशाक्षरी काव्य
१४/६/२०२०
स्पर्धेसाठी
विषय- **जीवनसाथी**
शिर्षक- *जीवनसाथी*
सुख आणि दु:ख विसरुन
बघ तुझ्या मनी माझ्या मनी
मृदू भावबंद उमजले,
आणि गुज गोड ह्रदयाचे
मस्त..दोघांनाही समजले. //१//
केली विश्वासाने डोळ्यातून
नजरेने नजरेला खूण
अव्यक्तसा इशारा आनंदी,
कळताच तो मजला माझा
मनमोर नाचला स्वच्छंदी. //२//
संगतीने निभावूया दोघे
बंध *जीवनसाथी* सदैव
नाते प्रेमामधे बांधलेले,
घट्ट जाणिवेच्या स्पंदनांनी
सदा एकमेका सांधलेले. //३//
♥️♥️♥️♥️♥️
राधिका बापट, डोंबिवली
****************************
स्पर्धेसाठी : प्रणिती दशाक्षरी काव्य
विषय : जीवनसाथी
जीवनसाथी तुम्ही ग माझे
मी तुमची जीवनसंगिनी
साथ ही जन्म जन्मांतरीची
सुख दुखांचे अनेक क्षण
साक्ष देती आपल्या प्रेमाची !
कर्तव्य नित्य ते बजावले
नित्य दुःखात दिली गं साथ
आहे पाठीशी तुझ्या नेहमी
असाच नित्य राहीन तुझा
म्हणे तुच गं माझी स्वामीनी !!
अशी साथ राहो सातजन्मी
असेच प्रेम मिळो मजला
मुलींचा प्रेमळ असे पिता
कोडकौतुक ते क्षणोक्षणी
मुलींना भासती ते गं माता !!!
स्मिता क्षीरसागर
***************************
स्पर्धेसाठी
प्रणिती दशाक्षरी
विषय :-- जीवनसाथी
शिर्षक :-- अखंड साथ
घेऊ सारे आता समजून
काय आहे जीवनाचे मर्म?
जीवनसाथी असो साजरा l
साथ द्यावी त्याने जन्मभर
जरी दूषित लाखो नजरा ll 1 ll
साथ एकमेकांना देऊया
आंनद जीवनी भरू सदा
सांगुया गूज प्रेमाचे कानी l
स्वर्गसुख अवतरे घरा
गाऊ प्रेमगीत राजाराणी ll 2 ll
करुया संकल्प प्रेमापोटी
माझा श्वास नीत तुझ्यासाठी l
सप्तपदीचे पाळू वचन l
अखंड साथ तुझीच हवी
तुझ्यासाठी माझे तन-मन ll 3 ll
अर्चना फुंड
बुऱ्हाणपूर
*************************
प्रणिती दशाक्षरी पाचोळी रचना
स्पर्धेसाठी
विषय = जीवनसाथी
आले मी लक्ष्मीच्या पावलांनी
लाभली साथ आयुष्यभरा
वाटेकरी सुखदुःखातला ,
आधार मज सावली सम
संसार सुखाने हो फुलला ......
आयुष्याच्या वळणावरती
प्रेमस्वरुपात भिजू दोघे
बनू यशस्वी जीवनसाथी ,
आनंदाचे क्षण लाभण्यास
सौभाग्याचं लेणं माझ्या माथी .....
रेशम बंधी जुळले नाते
राखले घराचे घरपण
स्वप्न उरीचे दोघे साकारु,
घेऊ विश्वासाने हाती हात
समर्पणाने स्वर्ग उभारु .....
सौ. सुनंदा नरेंद्र चौधरी
वसई .
*****************************
स्पर्धेसाठी
दशाक्षरी काव्य
जीवन साथी
अशी मिळावी जीवन साथी
ज्याने संसार सुखी होईल
असा विचार आला मनात
झालं तसं मिळाली सरिता
आता आयुष्य आहे सुखात
पेशा सहायक शिक्षिकेचा
माध्यमिक शाळेत शिकवी
वर्ग आठ , नऊ, दहावीला
एम.ए.मराठी शिक्षण तीचे
अंगी तीच्या इतरही कला
आयुष्याच्या या वळणावर
अशी जीवन साथी भेटली
उजळून गेलाय संसार
मला जरी नसेल नौकरी
समजले जीवनाचे सार
अनिल पिट्टलवार भद्रावती
जिल्हा चंद्रपूर
**************************
*स्पर्धेसाठी- दशाक्षरी*
*विषय- जीवनसाथी*
जीवनसाथी प्रेम, स्नेहाचा
लाभला मज खूपच छान
संसार रुपी रथाचा देव
कमी कधीही भासत नाही
कशाचाही नसे मज भेव
कितीही येवोत संकट वारे
नाव आमची न डगमगे
ज्येष्ठ नागरीक जाहलोही
जपतो एकमेकांना खूप
जीवनी आनंदी राहिलोही
मुलांना लाविले सुसंस्कार
सासू सासर्यांना सांभाळले
दोघे मिळूनी संसार रथ
ओढत आहोत काळजीने
मला जीवनसाथीची साथ
©️सौ.कालिंदी वाणी, डोंबिवली
**************************
स्पर्धेसाठी
जीवनसाथी
जीवनसाथी सोबत हवा
आयुष्याच्या हर टप्प्यावर
हातात हात त्याचा असावा
जीवनाच्या वळणावरती
सदैव सोबतीला दिसावा
सुख अन् दुःखाच्या प्रत्येक
क्षणांचा साक्षीदार असावा
मनातले भाव उमजावे
न सांगता ही सारेच कसे
त्याला अलगद समजावे
त्याच्या नी माझ्या प्रीतीचा बंध
पसरावा सर्वत्र सुगंध
दाटून यावा मनात हर्ष
त्याच्या संगतीनेच घडावा
माझा प्रवास वर्षानुवर्ष
सौ. पल्लवी येवले ,
**************************
प्रणिती पाचोळी दशाक्षरी स्पर्धेसाठी
विषय :-" जीवनसाथी "
शीर्षक :-" जन्मदिन शुभेच्छा "
कन्या लाडकी जाई सासरी
जीवनसाथीच्या संगतीने
दाटे आई-बाप नेत्री पाणी
भावभावना फुलती क्षण
प्रीत सख्याची धुंद तराणी //१//
अनुभव गुरू जीवनाचा
पती-पत्नी संसाराची चाकं
दोघांची प्रेरक बलस्थानं
परस्पर अढळ विश्वास
हेच संसाराचं मर्मस्थान //२//
शुभेच्छा देते जन्मदिनी या
सुख, शांती,धन अन कीर्ती,
मिळावी तुज लक्ष्मीसमान
दीर्घायुष्य लाभो दोघांनाही
मिळो शारदेचे वरदान //३//
सौ. सरोज सुरेश गाजरे
*************************
स्पर्धेसाठी दहाक्षरी
जीवनसाथी
जीवनसाथी पती व पत्नी
संसारी एकरूप असती
मतभेद सारे विसरन
वाटचाल करी आयुष्याची
सुख येईल भरभरून
आठवणींचे क्षण जपून
ह्रदयाच्या कप्प्यात ठेवती
सुखदुःखात व संकटात
जपणूक मनाची करिती
नाते विश्वासाचे हे दोघात
क्षण सुखाचे हे आले दारी
आनंद मिळे सहवासात
आपुलकी आणि प्रेमभाव
प्रेमळपणा सुंदर नाते
निरंतर मनी स्नेहभाव
सौ किशोरी शंकर पाटील,
*************************
स्पर्धेसाठीः-जीवनसाथी...!
जीवन साथी जीवन साथी
जन्म जन्म सात साथ देना
जीवन साथी जीवन साथी
मागतो हात तुझा आज मी
जीवन साथी जीवन साथी....१
सुखाचा संसार तुझा माझा
आनंदले घरकुल आता
सुसंस्कृत सुंदर जीवनी
सजवले स्वर्ग परी त्याला
जीवापाड सांभाळ करुनी....२
विश्वास तुझ्यावर टाकला
समर्पण संपूर्ण ना भेद
दरवळला तिथे सुगंध
दिर्घायु बनूनी जगतात
सुख शांती लाभो किर्ती गंध...३
©️✍️...
*मा.KVकल्याण राऊतसर*
मराठवाडाप्रदेश लातूर
***********************
प्रणिति काव्यसमुह दक्षाक्षरी आयोजित
स्पर्थेसाठी
शीर्षक। प्राणनाथ
यौवनाच्या उंबरठ्यावर
गरज असते सोबतीची,
तेथे प्राणनाथ भेटलासी,
झालो एकमेकांचे सोबती,
अर्धांगीनी पुर्ण जीवनासी //1//
सोबतीने आरंभी प्रवास,
शोधत आलो पाऊलवाट,
देवूनी प्रेम हातात हात,
पावसाळे सहजीवनाचे,
करीत संकटावर मात //2//
पार केले आजवर तप,
कधी आनंदात कधी कष्टी,
राग रूसवे नेहमी होती,
विविधरंगी भासे जीवन,
आपण सुखी जीवनसाथी //3//
सौ गीतांजली योगेश वाणी
गोरेगाव मुंबई
************************
: स्पर्धेसाठी
विषय:- जीवनसाथी
सुखाच्या या पैलतीरावर
जीवनसाथी बनून माझा
आयुष्यात भरलेत *रंग*
संसाराची धुरा सांभाळत
दोघांचे अनोखे असे *ढंग* १)
जीवनात तुझ्यामुळे सख्या
प्रेमज्योत तेवते सुखाची
दिशा मिळते हो *आयुष्याची*
नात्याची गुंफण रेशमाची
साथ संगतीची *विश्वासाची* २)
सहजीवनाच्या टप्यावर
सुंदर वळणावर चढत
जुळ्ल्या तारा छेडीत *सुर*
खाचखळग्याला ओलांडुनी
केले सारे अडथळे *दुर* ३)
सौ शरयु कुलकर्णी, पुणे
*********************
दशाक्षरी काव्यस्पर्धा
विषय - जीवनसाथी
नाव तुझे आहे ग प्रतिभा
कौशल्य तुझ्यात निराळेच
तुझा प्रेमळ स्वभाव भारी
पद होते शिक्षिकेचे तुझे
शिकवण्याची कलाच न्यारी....
माझी तुझ्याशी नाही ग भेट
तरी वाटते जीवनसाथी
सखी सोबती आमची खरी
लेखन व साहित्य क्षेत्रात
होते तुझी गगन भरारी....
वाढदिवस सखीचा माझ्या
अनंत शुभेच्छा देते आज
आई समान आहे तू मला
चांगले आरोग्य लाभो तुज
हेच मागणे माझे देवाला....
©माधुरी दायमा चाळीसगाव
*************************
*प्रणिती दशाक्षरी काव्य*
*स्पर्धेसाठी*
*विषय...जीवनसाथी*
नाते आपुले सखे प्रेमाचे
राहु देत जन्माचे अतूट
अशा स्नेहाला नको दुरावा
किती जपले नाते हर्षाचे
धुंद प्रेमा कशाला पुरावा...१
क्षण हसावा तुज पाहता
नच रुसवा क्षीण कारणा
गंधित जाहली ओली माती
नको रुसू आनंदी जगता
बहरुन येति प्रेम नाती...२
पाहता तुला जीवनसाथी
तुझ्या मनातील प्रेम अन
भावगंध कळतो मजला
घेऊ एकमेका हात हाती
सूर ओळख सारी तुजला...३
श्री.भागवत व्ही.एच.
विटा,सांगली
9503681594
Comments
Post a Comment