साथ जोडीदाराची

उपक्रम

विषय: साथ जोडीदाराची

तुझे नी माझे पहिले प्रेम
फुलवी कोमल भावना 
मनात मोर नाचू लागले
आनंद ह्रदयात मावेना...१!

नजरानजर झाली तेव्हा
लाजून गोरी मोरी झाले
हळूवार स्पर्श करताच
तिरप्या कटाक्षाने घायाळ केले...२!

हाती हात विश्वासाचा 
साथ देण्याची आण
भेटीगाठी वाढत गेल्या 
तरी ठेवीता जगाचे भान...३!

तुझे माझे पहिले प्रेम
आठवण येता तरी आज
किती करत होते मी रे
तुझ्यासाठीच शृंगार साज...४!

तुझ्या माझे पहिल्या प्रेम
किती गोड अनमोल क्षण
आयुष्यभर आठवण ठेवी
ह्रदयाच्या कोंदणात जपून...५!

अशीच साथ जन्मभरी
राहू दे सख्या मजला
तुझ्यासाठीच रे साजना
सारा शृंगार माझा सजला...६!

✍सौ. प्रतिभा विभूते
          पुणे

Comments