सल माझ्या जीवनातील
दि१८:०६:२०२०
ओळ काव्य
सल माझ्या जीवनाची
सल माझ्या जीवनाची
नाही येणार भरून
माया पित्याच्या भावना
गेल्या दुःखात विरून...१!
तीन तप गेले तरी
सल माझ्या जीवनाची
नाही झाली काही कमी
बाबा सोडून जाण्याची...२!
होत्या कोमल भावना
झाला आघात जोरात
घरदार सारेजण
गेले वाहून दुःखात...३!
अंत्य दर्शन ही नाही
नाही भेट झाली पुन्हा
सारे गणगोत येती
काय होता माझा गुन्हा...४!
घाय मोकलून रडे
बाबा तुमची छकुली
कसे विसरले मला
सदा म्हणता लाडली...५!
काही झाले तरी आता
आहे दुःख आयुष्याची
कधी कळेल कोणाला
सल माझ्या जीवनाची...६!
✍सौ. प्रतिभा विभूते,
पुणे.
Comments
Post a Comment