आडनावातील गंमतीजमती
आडनावातील गंमतीजमती
निवडणूका जाहीर झाल्या की राजकीय कामाला चांगलाच वेग येतो .यात प्रामुख्याने मोठ मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जातात .रोज पेपर मध्ये येणाऱ्या मुख्य बातम्या म्हणजे कोणाची सभा होती ,सभेचा वृतांत व सभेला हजर असलेले हैशे ,गवशे , नवशे या सर्वांची नामावली . न्यूज पेपर उघडला की या बातम्या फ्रन्ट पेजवर आपल्याला दिसतात. रोज अशा बातम्या वाचतांना मला " एक विचित्र छंद जडला होता , त्या सभेला हजर असणाऱ्या व्यक्तीचे गमतीशीर आडनावे वाचण्याचा ." मग अशा विचित्र आडनावाचा मी संग्रह केला आहे , छान गंमत वाटते तो संग्रह वाचून .
आता " आडनावे " कशी असावीत याला काही नियम नाहीत ,ते कसेही असू शकतात. कोणाचे आडनाव रंगावरून , कोणाचे व्यवसायावरून ,कोणाचे जातीवरून तर कोणाचे पर्दाथावरून , भाज्यावरून , एवढेच काय तर प्राणी , पक्षी यांच्या नावावरुन देखिल आडनाव असतात. काही आडनाव संख्या दर्शक असतात तर काही भितीदायक सुध्दा असतात. " प्रथम मी माफी मागते ती सर्व वाचकांची. कारण माझ्या संग्रहातील आडनाव कदाचित आपल्या पैकी कोणाचेही असू शकते." केवळ मनाची करमणूक करणे एवढाच निखळ उद्देश या मागे आहे .तेव्हा राग नसावा ही विनंती!
व्यक्ती जन्माला आली की त्यांचे पालक आपल्या पसंतीने मुलामुलीचे नाव ठेवतात पण आडनाव मात्र एकच पिढ्यानपिढ्या चालत आलेली असतात.जसे रंगावरून असणारी आडनावे बघा. उदा - काळे , गोरे , सावळे , हिरवे , ढवळे , तांबडे अशी विविध रंगाचे आडनावे आहेत. एकदा काळे काकू खूप घाईघाईने बाहेर जातांना दिसल्या. मी सहज विचारले काय काकू कुठे निघालात एवढ्या घाईत ? तर त्या म्हणाल्या अग तांबडे बाईकडे हळदीकुंकवाला. मला वाटले तांबडे बाईच्या कुकंवाचा रंग नावाप्रमाणेच लालभडक असावा बहुतेक ! एकदा तर गंमतच झाली. माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे दोन गृहस्थ आमच्या कडे आले होते. त्या वेळी मिस्टर घरी नसल्याने मी त्या दोघांची चौकशी केली. काही निरोप असेल तर द्या म्हणून सांगितले. तर ते म्हणाले काळेगोरे येऊन गेले म्हणून सांगा .यात गंमत अशी होती ज्याचे नाव गोरे होते तो माणूस रंगाने काळा होता तर ज्याचे आडनाव काळे होते ती व्यक्ती गोरी होती. हे मला नंतर समजले.
आता पशु प्राण्यांच्या नावावरून असणारे आडनावे पहा. कावळे , ऊंदरे , बकरे , मांजरे ,एडके, कोल्हे , डुकरे , अस्वले , लांडगे , मोरे , चित्ते , वाघ , रानबोके , सरडे , सिंह , बेडके ,ससाणे , गरुडे , ऊंदीरमारे , राजहंस , बाप रे ही सर्व आडनावे ऐकून असे वाटते की जंगलातील सर्व प्राणी जंगल सोडून शहरात राहायला आली की काय ? या सर्वांनवर वरचढ आडनाव म्हणजे ' वाघमारे '! आहो जिथे वाघाला च मारतात तिथे माणसाचे काय? पण या सर्वात ' राजहंस ' हे आडनाव मात्र रूबाबदार वाटते.जसे मोठ मोठ्या उद्योजकांची आडनावे मात्र या प्रमाणे असतात . उदा - टाटा , बिर्ला , किर्लोस्कर , गोदरेज. यातील गोदरेज हे आडनाव ऐकले की आम्हा मुलांना आठवते ते फक्त लोंखडी कपाट .यात गंमत अशी होती 'गोदरेज ' हे कपाटाचे नाव नाही तर ते बनवणार्या व्यक्तीचे आडनाव आहे. हे आम्हाला नंतर समजले.
आपल्या स्वयंपाक घरात रोज होणाऱ्या चविष्ट पदार्थाच्या नावावरून आडनावे पहा उदा - शिरापुरे , तुपसाखरे , भातलवंडे , साखरे , भाजीभाकरे , भाकरे , वांगे , कांदे , भोपळे , रायते अशी चविष्ट आडनावे माझ्या संग्रहाला ' सुग्रास ' करतात. यात काल एका आडनावाची भर पडली आहे ते म्हणजे ' कुकर ' हे आडनाव .आपल्या स्वायपांक घरातील महत्त्वाचे साधन .या सर्वान मध्ये माझे आडनाव ' पडवळे नाही बर का ! या चविष्ट नावाचे क्रेडीट घेतात ती मसाल्याची आडनावे उदा -हिंगमिरे , हिंगे , लसणे , हळदणकर , वेखंडे , मिरे , जिरे या सारखे. वाटतात ना फोडणी घातल्या सारखी ' झणझणीत ' आडनावे पण या शिवाय आपल्या रोजच्या जेवणाला चव नाही बर का ! आणि हो माझ्या संग्रहात ' कडू ' हे आडनाव आहे बर का. कडू आडनाव ऐकून केले ना तोंड वेडेवाकडे पण जसे ' गोडकर ' हे आडनाव ऐकून बरे वाटते तसे ' कडू ' ही चव म्हटले की आठवते ती कारल्याची भाजी. आपल्या आरोग्य साठी अतिशय उपयुक्त भाजी.
आता "जहागीरदार" हे आडनाव पहा. तुम्हा आम्हा सर्वांना माहित असलेले पण गंमत अशी आहे की आपण एखाद्या माणसाला राग आला की म्हणतो तू स्वतः ला काय जहागिरदाराचा बेटा समजतोस काय ? पण जहागीरदार काकूनां मात्र स्वतः च्या मुलाला असे काही म्हणण्याची सोय नाही. "भोसले" हे आडनाव ऐकले की महाराष्ट्रातील तमाम लोकांची छाती अभिमानाने भरून येते व त्या क्षणी आठवतात ते सर्वाचे लाडके दैवत असलेले "शिवाजीराजे भोसले" किती अभिमान वाटतो हे आडनाव ऐकून तर प्रधान , दिवान , राव , राजे , सावंत , गवई असे आडनावे ऐकली की राजदरबारात असल्या सारखे वाटते. "होळकर" आडनाव म्हटले की आठवतात त्या दानशूर "पुण्यवान आहिल्याबाई होळकर".
जातीवाचक आडनावे मध्ये येणारी आडनावे पहा .उदा- लोहार , सुतार , शिंपी , सोनार , कुंभार , रंगारी , कोमटी , तांबट , कासार , कोष्टी या आडनावा वरून ती व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे समजते. तर धातूवरून असणारी आडनावे याप्रमाणें उदा - लोखंडे , तांबे , पितळे , ढक्कनवाले , बाटलीवाले असे अनेक आडनावे आहेत. एक आडनाव तर प्रथम ऐकताना इतके विचित्र वाटले की मनात आले असे ही आडनाव असू शकते? परवाच आमच्या शेजारी एक बिर्हाड राहण्यासाठी आले आहे. ओळख झाल्यावर मी सहज त्या बाईला विचारले तुमचे आडनाव काय आहे ? तर त्या बाई म्हणाल्या ' मारू ' मी आश्चर्याने त्याच्या कडे पाहिले .मला वाटले माझी काही चुक झाली का? त्या बाईच्या लक्षात आल्यावर ती म्हणाली माझे आडनाव ' मारू ' आहे.अशीच अजून एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगणार आहे. आमच्या काँलनीत राहणाऱ्या त्या दोघी शेजारी खूप जिवलग मैत्रीणी होत्या. नेहमी रस्त्याने येता जाता मला मला भेटत असत. एके दिवशी मी विचारले आडनाव काय आहे? तर लगेच एकदम दोघी म्हणाल्या खरेखोटे. मी म्हटले आडनाव विचारले तर त्यातील एकजण हसत म्हणाली माझे आडनाव खरे आणि हिचे आडनाव खोटे. मी ही हसून म्हणाले वाह ! छान जोडी जमली आहे . खरे-खोटे आडनाव प्रमाणेच तांबट-लांबट , विळे -भोपळे , लुळे - पांगळे , आंधळे - बहिरे ,काळे-फडके अशी आडनावे माझ्या संग्रहात सामील झाले आहेत.
बघता बघता किती वेगवेगळे आडनावे तुम्हाला माहिती झाले आहे. अजूनही अनेक आडनावे माझ्या संग्रहात आहेत. जसे महाशब्दे हे आडनाव ऐकले की वाटते खूप मोठ्या शब्दाचा संग्रह यांच्या कडे असावा. पंडीत आडनाव असणारे ज्ञानी असावेत तर बुध्दीमत्ता दाखवणारे सहस्त्रबुद्धे हे आडनाव असणारे असावे. आंबटकर हे आडनाव ऐकले की तोंडाला पाणी सुटते तर ओक आडनाव ऐकले की उगीच मळमळल्या सारखे वाटते. पोवळे , रत्ने , हिरे ही श्रीमंतीचे लक्षण दाखवणारे आडनावे पण या रत्नाची पारख करणारे आडनाव म्हणजे "रत्नपारखी". आहे ना अशा अनेक आडनावातही गंमत.
आता काही आडनावे मात्र दोषवाचक असतात.उदा - फेगडे , बोबडे , आंधळे , धटिंगण , ढोले , रोडे , गबदुले , वरडोळे , रोगे , पायमोडे यासारखी तर काही अतिशय भितीदायक आडनावे असतात. सालकाडे , आगलावे , गालफाडे , डोईफोडे , मानतोडे , जिभकाटे , बैलमारे , कानकाटे , रगात चाटे , प्राणजाळे मानमोडे बाप रे ! अशी आडनावे ऐकून अंगावर काटाच उभा राहतो. इतर काही आडनावे अशी आहेत की ते कुठल्याही कँटेगिरी मध्ये बसत नाही पण थोडीशी विचित्र वाटतात प्रथम ऐकतांना , उदा - टिल्लू , पाटदुके , डोके , दूधवडकर , ठोके , चोरमुंगे , दुधमांडे , तुपे , पिसाळ , बेंबडे , लिंगाडे , पिसाट , घोडे , सपाटे , टवळे , भोस्के , दुकाने , फुकटे , उन्हाळे आणि हो' ठमके ' आडनाव राहिलच .ठ ला जर उकार मिळाला असता तर मस्त ठुमके झाले असते नी त्यांच्या बायका मस्त ठुमकत चालल्या असत्या . तर अशा अनेक मजेशीर आडनावाचा संग्रह मी केलेला आहे .तुम्हीही करून बघा .कदाचित तुम्हाला अजून गमतीशीर आडनावे सापडतील आणि हो एक महत्त्वाचे सांगायचे राहिले आहे. कृपया माझ्या आडनावा मधून ' वि ' मात्र वजा करू नका हं! नाही तर माझे आडनाव ऐकून तुम्ही मलाच घाबराल !!
सौ .प्रतिभा विभूते.

**VERY VERY NICE**
ReplyDelete