चिमण्यां
दि:१३:४:२०२०
चित्र काव्य.
पोटभरण्या दोन घास मिळाले
निरागस हास्य फुलले गाली
समाधानी किती दिसते बाला
बालहास्य पाहूनआईची कळी खुलली....१!
असेल त्यात मार्ग शोधीता
निसर्गाचे पांघरूण करीता
खुले आकाश कवेत घेऊन
शांत चित्ताने निद्रा घेता...२!
असेल जरी फुटका आरसा
भाग्य माझे किती बाळ हसतो
अनमोल हा आनंद मिळतो
आईच्या चेहर्यावर आनंद फुलतो...३!
✍सौ. प्रतिभा विभूते
पुणे.
Comments
Post a Comment