शिक्षक
दि: २०:४:२०२०
*शिक्षक**
शिक्षक माझे गुरू
सुंदर कल्पतरू
देतती ज्ञानाची छाया
तया नमस्कार करू
जीवनात मिळाले
शिक्षकांमुळे ज्ञान
समाजात वाढला
त्यामुळे माझा बहुमान
पहिले गुरू माता पिता
शिक्षक ज्ञानाचा सागर
माझ्या जीवनाला दिशा
देणारे विद्येचे आगर
ज्ञानदान दिले मला
भरपूर शिक्षकांने
जीवन सफल झाले
त्यांच्या आशीर्वादाने
✍सौ. प्रतिभा विभूते
पुणे.
माझे जीवन घडविण्यासाठी जे जे शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात आले त्या सर्वांना हे काव्य समर्पित करते.
🌹🙏🏻🌹
Comments
Post a Comment