भाऊराया.

दि:२९:१०:

भाऊराया.

प्रेम भावना तुमच्या मनीच्या
कळतात रे मज भाऊराया
जन्मोजन्मी चे नाते आपुले
घ्या समजून अंतरीची माया       ||१||

आहेत सुंदर बंधू दोन
राम,लक्ष्मण जोडी छान
अभिमान वाटे बहिणींना फार
म्हणूनच मिळतो वडिलकीचा मान ||२||

हरवले पित्याचे आधार छत्र
व्याकूळ झालो मनोमनी
सदोदित राहिलास पाठीशी
पित्याची जागा घेऊनी ||३||

सगळ्या कुटुंबाचा भार झेलून
कर्तव्य केली वडिला समान
लहान बहिणीचे करून कन्यादान
जगी झालात तुम्ही महान ||४||

राखीच्या रेशमी कोमल धाग्याने
बहिण भावाचे मन जुळली
सदैव आठवण राहो भाऊबीज
शब्दरूपी काव्याने भावना कळली ||५||

नको पैसा नको काही
आहात तूम्ही प्रेमाचा सागर
थकले असेल जेव्हा विसाव्यासाठी
असू द्या चार दिवसाचे माहेर   ||६||

दोन्ही बंधूस मिळो आयुष्य छान
निरोगी, सुख, समाधान
काही मागणे नसे देवा तुजकडे
सुखी ठेव जोडी माझी तुला आन ||७||

  ✍ सौ. प्रतिभा विभूते
         पुणे.©®

Comments