आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
*आई*
जन्मदात्री आई गुरू
ती सुंदर कल्पतरू
देते प्रेमाची छाया
नमस्कार आपण करू
जीवनात मिळाले
आईमुळे मज ज्ञान
समाजात वाढला हो
तिच्या मुळे बहुमान
पहिले गुरू माता पिता
आई ज्ञानाचा सागर
माझ्या जीवनाला दिशा
देणारे विद्येचे आगर
संस्कार आईने दिले
अनमोल ते जीवनात
जीवन सफल करण्याची
ताकद तिच्या आशीर्वादात
✍सौ. प्रतिभा विभूते
पुणे.©®
माझ्या आईच्या चरणी समर्पित.🙏🏻
Comments
Post a Comment