शब्द वल्लरी काव्यसंग्रह

दि: २५:११:१९

*माझे बाबा*

कल्पवृक्ष कन्येसाठी 
लावूनिया बाबा गेला
सुखाची छाया धरूनी
आधार आम्हा दिला |१|

रम्य होते माझे बालपण
अंगाखांद्यावर खेळवले
मायेनेच गोंजरताच
सारे दुःख पळविले|२|

आई म्हणे नका
 इतका जीव लावू
एक दिवस जाईल
सोडून लाडकी माऊ |३|

अर्धवट संसार सोडून
गेले निघून कसे तुम्ही
कसा विरह सहन करू
सांगा ना बाबा आम्ही? |४|

कधी केली नाही
पर्वा तुम्ही स्वत:ची
सदैव काळजी होती
तुम्हाला सर्व कुटुंबाची|५|

नाही जाणार कष्ट वाया
तुमचा त्याग, बलीदान
लाडकी लेक तुमची आहे
याचा मला रास्त अभिमान |६|

देवा एकच मागणे 
हात जोडूनी तुला
जन्मोजन्मी हेच हवेत
मायाळू बाबा मला...|७|

✍ सौ. प्रतिभा विभूते
       पुणे.

Comments