गणपती बाप्पा आले.

*आले आले आले, गणपती बाप्पा आले*

पाहून हर्ष उल्हास, भक्तांच्या भेटीसाठी,
आले आले आले गणपती बाप्पा आले ॥धृ॥

वाजत गाजत येता घरी गणरायाची स्वारी,
माणिकमोती लावून सजावट केली न्यारी,
भरजरी पैठणी नेसून केली पूजेची तयारी,
आले आले आले गणपती बाप्पा आले ॥१॥

मंजुळ सनई वाजे, बाप्पांचा जयघोष गाजे,
आनंदाने पुढे नाचती, भाविक तालावर मौजे,
भावभक्तीने हृदय भरले, मन हळवे झाले,
आले आले आले गणपती बाप्पा आले ॥२॥

घरात पाऊल पडता, पंचारती ओवाळिते,
लाडू मोदक नैवेद्य सुगंधी फुलांची बरसात,
भक्तांनी गुलाल उधळीत स्वागत केले,
आले आले आले गणपती बाप्पा आले ॥३॥

सुंदर मोहक मूर्ती करते मनोकामना पूर्ती,
सदनी पाऊल पडता लाभे सुख शांती,
बाप्पांच्या कृपेने जीवनाचे सार्थक झाले,
आले आले आले गणपती बाप्पा आले ॥४॥

✍सौ. प्रतिभा विभूते,
                 पुणे.©®

Comments