"मिलन"
येरे येरे पावसा,
मेघ दाटले नभांगणी,
वाट पाहते सख्याची,
तृष्णा झालेली धरणी ।
भेगा पडल्या देहाला,
जीव झाला कासाविस,
कोरडे झाले डोळे,
नाही पाण्याचा ठिपूस ।
वसुंधरेचा ऐकून आक्रोश,
टरटरा काळीज फाटलं,
कधी भेटेन सखीला,
अस मेघराजाला वाटलं ।
कडकडत विजेचा संग,
कोसळला रानोमाळी खूप,
प्रियकराच्या मिलनाने झाले,
धरा चे हिरवेगार रुप ।
✍ सौ प्रतिभा विभूते. पुणे.
Comments
Post a Comment