पाऊस

सर सर घोंगावत सुटला चपळ अवखळ वारा,
श्वासा मागून श्वास घेतला जपून ठेवला सारा ।

खोडकर  खट्याळ पोरासारखा नकोस मागे धावू,
मेघराज बरसताना धरतीवर अलगद थेंब थेंब पाहू ।

बघता बघता पावसाच्या पडती सरी वर सरी,
पहिल्या पावसात चिंब भिजून टपोरे थेंब अंगावरी ।      

ओली चिंब झाली धरणी फुटू लागल्या वृक्ष वेली,
पाऊस धरा वर पडताच डोंगर दर्यानी पांघरल्या हिरव्या शाली।

नदी नाले ओथंबून भरले खळखळ  वाहती  पाणी,
नितळ वाहणाऱ्या झर्याचे ऐका मंजुळ स्वारातील गाणे।

शृंगारलेल्या  सृष्टीचे मोहक नजारा भरून पाहू डोळे,
कृपादृष्टी झाली पावसाची सुख समृध्दी पायाशी लोळे।

✍  सौ प्रतिभा विभूते. पुणे.

Comments