आई
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरे साक्षात परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥१॥
माझ्या आईचे वय नक्की सांगता येत नाही पण ती ७५ च्या आसपास असावी असा अंदाज आहे. त्यावेळेची परिस्तिथी फार वेगळी होती. शिक्षणाला महत्व नव्हते. आई जेमतेम दुसरी पर्यंत शिकली. तिला वाचता चांगले येते पण लिहिते थोडेफार. लहान वयात आईचे लग्न झाले, त्यामुळे लग्नानंतर घरकाम व स्वयंपाक बाबानेच करायला शिकवले. तेव्हा पासून आई समर्थपणे संसाराचा गाडा ओढते आहे. आई स्वभावाने खूप भित्री होती त्यामुळे आम्ही कधीच तिला कोणाशी भांडताना पाहिले नाही. तिच्या गरीब स्वभावच काही लोक गैरफायदा घेत असे. चूक असो किंवा नसो ऐकून घेते म्हणून सासरची मंडळी काहीही बोलायची, त्रास द्यायची. पण आईने कधीही त्यांना उलट उत्तर दिले नाही. सर्वकाही निमूटपण सहन करायची. मला समजायला लागल्यावर या गोष्टीचा खूप राग यायचा. मी आईवर खूप चिडायची. तू का नाही बोलत? का अन्याय सहन करते? कधीतरी यांना सडेतोड उत्तर दे. पण नाही. आई म्हणायची आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी हे सगळं सहन केलं पाहिजे. वडिलांची आईवर खूप माया होती. घरात मोठे असल्यामुळे लहान भावन्डाची जबाबदारी वडिलांवर होती . घरात जेमतेम पैसा असल्यामुळे आईला खूप काटकसर करावी लागे पण तिने कधीही तक्रार नाही केली. वडिलांना निष्ठेने साथ दिली. आम्हा मुलांवर अनमोल संस्कार केले. आईने दिलेली संस्कार शिदोरी मी जतन केल्यामुळेच मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार करता आले. आई शिक्षणात अडाणी असली तरी व्यवहारात मात्र हुशार होती. सर्वांशी मिळून मिसळून वागत असे कोणाचे अडले नडले असेल तर त्यांना मदत करत असे. आमच्या घरी पाहुण्यांची नेहमी ये जा सुरू असते. अचानक चार पाहुणे आले तरी आई त्यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नसे. आम्ही नेहमी म्हणत "कशाला एवढे दमते ग ?" चहा पाणी करून पाठवायचे पाहुणे. पण नाही. "अतिथी देवो भव : " असे ती म्हणायची. कधी कोणाच्या रूपाने परमेश्वर आपल्या घरी येईल सांगता येत नाही. परमेश्वरावर तिची नितांत श्रद्धा आहे. पण खरं सांगू आईवडिलांची पुण्याई म्हणा किंवा परमेश्वराची कृपा म्हणा आमच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सर्वजण अगदी आनंदात व सुखात होतो.
माझे वडील सरकार नोकरीत असल्यामुळे रात्री उशिरा घरी येत असत. आम्ही लवकर जेवण करून झोपत असत. बाबा घरी आले की आम्हाला झोपेतून उठवून जेवणासाठी आग्रह करत असे. आई सांगायची मुली जेवण करूनच झोपल्या आहेत. बाबा सोबत चार घास खाल्याशिवाय त्यांचे समाधान व्हायचे नाही. मग भूक नसतानाही आम्ही त्यांच्या समाधानासाठी थोडे खाऊन घ्यायचो. आई चेष्टेने म्हणायची, " मी काही त्यांची सावत्र आई नाही, त्यांना उपाशी ठेवायला " अशी असते आई वडिलांची माया. वडील होते तोपर्यंत त्यांनी आमचे खूप लाड केले. खूप चैन नसली तरी कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ दिली नाही. आमचे बालपण आनंदात व सुखात गेले. मोठी बहिणी सासरी गेली तेंव्हा पहिल्यांदा बाबाना खूप रडताना पाहिले आणि माझे मन कासावीस झाले. मुलींना सासरी पाठवताना आई वडिलांच्या मनाला किती वेदना होतात ते स्वतः आई झाल्याशिवाय समजत नाही. त्यावेळी आईने बाबाना धीर दिला. वेळप्रसंगी आई कणखर बनायची. बाबा आईला म्हणायचे, "या चिमण्यांना असेच पंख फुटतील आणि एक एक करून सर्वजणी आपल्याला सोडून निघून जातील". पुढे वडिलांचा सहवास आम्हाला फारसा लाभला नाही.
बाबा सहसा चिडत नसत, मात्र एखाद्या वेळेस रागावले की मग खूप चिडायचे. आम्ही आई पेक्षा
बाबाना खूप घाबरायचो. आईचे मात्र ' गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे ' नेहमीच चालू असायचे. आई वडिलांमध्ये श्रेष्ठ कोण? असा कधी प्रश्न पडला तर दोघेही तेवढेच महत्वाचे वाटायचे. आई घरातील "मांगल्य" होती तर बाबा "कर्तव्यनिष्ठ" पालक. दुःखाच्या वेळी आई रडून आपले दुःख व्यक्त करायची. अशावेळी बाबा मात्र त्या बिकट प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचे. आमच्यासाठी आई वडिल हेच आमचे "दैवत" होते. म्हणूनच त्यांच्याबद्दल अपार माया, सद्भावना आणि आपुलकी आजही माझ्या मनात आहे. त्यांचे प्रेम, आशीर्वाद मिळणे ह्यासारखा "सुख" जगाच्या पाठीवर दुसरे नाही.
मला वडिलांचं सहवास फार कमी मिळला. अर्ध्यावरती डाव मोडून बाबा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मात्र आई आमची जास्त काळजी घेऊ लागली. वडिलांची उणीव भासू नये म्हणून स्वतःला डोंगराएवढे दुःख झाले असताना आम्हा मुलांवर मायेची फुंकर घालत राहिली. भाऊ कमवता होता हाच काय तो तिला आधार होता. बाकी सर्व भावंडं लहान होती. आईने खूप कष्ट करून आमच्या आयुष्याला व्यवस्तीत वळण लावले. आई बद्दल सांगताना माझे शब्द अपुरे पडत आहेत. आई म्हणजे काय?
आ- म्हणजे आत्मा,
ई - म्हणजे ईश्वर
हे दोन शब्द म्हणजे माझी आई. परमेश्वर जसा आपल्याकडून अनेक चुका झाल्यातरी आपण त्याला शरण गेलो की तो आपल्याला माफ करतो, तसेच "आई" ही मुलांचे अनेक अपराध झाले तरी त्याला क्षमा करते. म्हणूनच परमेश्वराच्या ठिकाणी आईला मानले जाते. लहानपणी आई रागावली की खूप राग येत असे. आई भावांचा जास्त लाड करते आणि आम्हाला सारखी रागावते असे वाटायचे, पण आई मनाने खूप हळवी होती. आपल्या मुलांनी सुसंकृत व्हावे, चांगले संस्कारी व्हावे यासाठी ती नेहमी झटत असे. आमच्या भल्यासाठी ती रागावत असे, पण आम्ही नासमज असल्यामुळे आम्हाला आईचा राग यायचा. अशावेळी राग काढायला हक्काचा माणूस आई शिवाय कोण असणार हे मला स्वतः आई झाल्यावर कळतंय. आपण कितीवेळा दुखावलं असणार तिला. पण तिने मात्र वेळोवेळी समजून घेतले आणि "सक्षम व मार्गदर्शक आई" म्हणून सदैव आमच्या पाठीशी उभी राहिली. "आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू" या शब्दाचा अर्थ आता मला मोठी झाल्यावर कळतो आहे. माझ्या आईचे जीवन सर्वांची सेवा करण्यातच गेले. आता सारखी त्यावेळी मुलींच्या हातात सत्ता नव्हती म्हणून सासरी आल्यावरही मला तिच्यासाठी फारसं काही करता नाही आले. एकदा मी माहेरी गेले होते त्यावेळी शेजारच्या काकूंना पणतू झाला होता. त्यांच्याकडे नातवाला मूल झाले की पणजीच्या मांडीवर बाळाला घेऊन सोन्या चांदीचे फुलं करून त्यांच्या अंगावर उधळतात. या कार्यक्रमासाठी आम्ही तिथे गेलो होतो. कार्यक्रम खूप छान झाला. माझ्या आईला या गोष्टीचे खूप कौतुक वाटले. आमच्याकडे असं कोणी कौतुक करत नाही असं ती सहज बोलून गेली. काकू म्हणाल्या प्रतिभा तुला नातू झाला की तू आईसाठी असा कार्यक्रम कर. मी ती गोष्ट लक्षात ठेवली. पुढे पाच वर्षांनी मला नातू झाला. त्यावेळी खास आईच्या इच्छेखातर मी हा कार्यक्रम माझ्या घरी केला. आईला खूप आनंद झाला. आपल्या मनातील इच्छा आपल्या मुलीने पूर्ण केली याचे तिला खूप समाधान वाटले. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही मला समाधान देत आहे.
आपण आपल्या आईसाठी काय केले यापेक्षा आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केले याचे मोल कधीच होऊ शकत नाही. मनातल्या प्रत्येक भावना बोलून दाखवता येत नाहीत, जमेल तशा शब्दांमधून मी माझ्या आई विषयीच्या भावना या लेखद्रारे व्यक्त करत आहे.
ब्राह्मदेवाने निर्माण केलेल्या या सृष्टी मधली अत्यंत सुंदर निर्मिती म्हणजे "आई", मग ती कुणाचीही असो. तिचा आदर करा तिला सन्मानाने वागवा. शेवटी माझ्या आईला नमस्कार करते आणि परमेश्वराजवळ तिला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करून मी आपला निरोप घेते.
धन्यवाद,
सौ. प्रतिभा विभुते.

Sundar lekh
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteekdam chan lekh
ReplyDeleteDhanyawad ...
DeleteMast
ReplyDelete