बालपणीची चूक
"बालपणीची
चूक "
आजकाल टीव्ही
न्यूज
असो किंवा पेपर
मधली न्यूज
असो,त्यात सर्वात
जास्त न्यूज असतील
त्या स्त्रिभृण हत्या
, बलात्कार किंवा स्त्रीयांवर होणारे
अत्याचार यावरच असतात . दररोज
कुठे ना कुठे
ह्या गोष्टी घडतात.
आपण पेपर मध्ये
वाचतो किंवा टीव्ही
वर बघतो,ऐकतो
.अपराध घडतात पण अपराधी
मात्र मोकाट सुटलेले
असतात. ह्या सर्व
गोष्टींची आता आपल्याला
सवय झाली आहे.खरेतर यात काही
अंशी आपण सर्वजण
दोषी आहोत असेच
म्हणावे लागेल.
आपल्या देशात आज ही
स्त्रिजन्माचे स्वागत केले जात
नाही.जन्मापासूनच मुलींचा
द्वेष केला जातो.
त्यात सध्या तरी
एक किंवा दोन
अपत्य असणारे पालक
मुलगी,मुलगा असा
भेदभाव करतांना दिसत नाही.पण जास्त
अपत्य असणाऱ्या घरात
मात्र असा भेदभाव
करतांना दिसतो.अजुन ही मुलगा
म्हणजे वंशाचा दिवा मानला
जातो.मुलगी काय तर
दुसऱ्याचे धन,असे
बोलले जाते.
या बाबतीत नीला मात्र
नशीबवान होती.नीलाला
पाच बहिणी व
एक भाऊ असे
नीलासहीत सात भावंडांचा
परिवार .नीलाच्या आई ,वडिलां
नी कधीही मुलगा,मुलगी असा भेदभाव
केला नाही.सर्व
मुलांनवर ते सारखीच
माया करत असे
.
या उलट
नीलाच्या काकांना पाच मुल
व एक मुलगी
होती.आपल्याला मुल
असल्याचा काका काकूनां
फार अभिमान होता.ते सतत
मुलाचे लाड करण्यात
व्यस्त असत. कोणी
सहज जरी विचारले
त्यानां तुम्हाला किती मुल
आहेत?तर मोठ्या
तोऱ्यात म्हणायचे मला पाच
मुल व एक
मुलगी आहे. दादाला
मात्र सहा मुलीच
झाल्या आहेत. नीलाच्या वडिलांना
ते दादा म्हणत
असे.नीलाच्या वडिलांना
मात्र आपल्या भावाबदल
खूप प्रेम होते.तर असा
हा दोघा भावाचा
परिवार .नीलाची वडील नोकरी
निमित्ताने बाहेर गावी राहात
होते.नीलाची आजी
काका,काकू कडेच
राहायची.काका शिक्षक
होते.काकांना मुल
असल्यामुळे आजी त्या
सर्वांचे खुप लाड
करत असे.त्या
सर्व नातवाचे खूप कौतुक करायाच्या.या उलट
नीलाची आईचा मात्र
त्या दुस्वास करत
असत.मोठ्या सुनेला
मुलीच झाल्या याचा
आजीला खुप राग
होता.हा सगळा
दोष नीलाच्या आईचा
आहे असे त्यांना
वाटत होते.
नीला तशी
सरळ साधी पण
महत्वाकांक्षा बाळगणारी मुलगी होती.शिक्षणाची तिला खूप
आवड होती.नृत्यकला,खेळात तिने
विशेष प्राविण्य मिळवले
होते.नवीन नवीन
गोष्टी शिकण्याची तिला खूप
आवड होती.यावर्षी
ती सातवी पास
झाली आणि तिच्या
वडिलांची बदली एका
लहानशा खेडेगावात झाली.
त्या गावामध्ये
फक्त सातवी पर्यंतच
शाळा होती.नीलाला
शिक्षणाची खूप आवड
असल्यामुळे तिला पुढील
शिक्षणासाठी काकाकडे राहावे लागले. आईवडिलांच्या प्रेमळ सानिध्यात वाढलेली
नीला काकाकडे राहवयाला
आली.तिची शाळा
सुरू झाली.नीलाचे
वडील शक्य होईल
तेवढी काकांना मदत
करत असत.भावाचा
परिवार मोठा असल्यामुळे,आपल्या मुलीच्या शिक्षणाचा
भार त्याच्या वर
नको म्हणून नीलाचा
सर्व खर्च तिचे
वडिलच करत असत.सुरवातीला
थोडे दिवस आनंदात
गेले.हळूहळू काकाकाकूंचा
व तिच्या आजीचा
खरा स्वाभाव नीलाला
समजू लागला.ती
मुलगी असल्यामुळे ते
तिचा द्वेष करत
असत.शिकून काय
दिवे लावणार आहेस
का? शिक्षणघेण्यापेक्षा घरकाम
शिकून घे.मुलीच्या
जातीला काय करायचे
आहे शिकून.त्यापेक्षा
काकूला घरकामात मदत कर
,ते काम नीट
शिकून घे.आजीने
फुकटचा सल्ला दिला. याउलट तिच्या चुलत
भावंडांना शिकण्यासाठी आग्रह करत
असे. पण त्यांना
शिक्षणाची बिलकुल आवड नव्हती.आति लाडामुळे
तिचे भाऊ बिघडत
चालले होते.
नीलाला खूप वाईट
वाटले.तिला अशा
गोष्टीची सवय नव्हती.तिच्या घरी कधीही
मुला मुली मध्ये
भेदभाव नसायचा.नीलाला वाटत
होते काका काकूंनी
नाही तर निदान
आजीने तरी तिचे
लाड करावे.तिला
प्रेमाने जवळ घ्यावे,समजूत काढावी. शिक्षणाच्या
निमित्ताने ती आईवडिलांना
सोडून काकाच्या घरी
आली होती .अशा
वेळेस आजीने तिला
सांभाळून घ्यावे. पण कसले
काय? आजीला फक्त
नातूच प्यारे होते
.काकाच्या मुलांचे ती खूप
लाड करत असे.सर्वांच्या फाजील लाडामुळे
तिचे चुलत भाऊ
बिघडत चालली होती
पण या गोष्टी
कडे कोणाचेच लक्ष
नव्हते.ते मुल
आजी बरोबर कधीही
नीट वागत नव्हते.
याउलट नीला आजीशी
प्रेमाने वागत असे.
ती आईवडिलांच्या
चांगल्या संस्कारात वाढलेली होती.ती
मुलगी होती हा
काही तिचा दोष
नव्हता.हळूहळू नीलावर या
वाईट गोष्टीचा परिणाम
होऊ लागला.काही
वेळेला तर नीलाला
आजीचा खूप राग
येत असे.तिच्याकडून
काम करून घ्यायचे
असेल तेव्हा आजी
तिच्याशी गोड बोलत
असे.काम करून
झाले की पुन्हा
पहिल्या सारखी वागत असे.आजीच्या अशा वागण्याने
नीला मनातून खूप
दु:खी होत
असे.
एकदा आजी खूप
आजारी पडली.नीलाचे
आईवडिल आजीला भेटायला आले.
आईवडिलांना भेटून नीलाला खूप
आनंद झाला.आपल्या
मनातील दु:ख
त्यांना सांगावे असे तिला
वाटले .पण आपण
जर असे केले
तर आईवडिलांना वाईट
वाटेल म्हणून मनात
आलेला विचार तिने
बाजूला केला. सध्या घरातील
सर्वजण तिच्याशी प्रेमाने वागत
होते. आजीला भेटून
आईवडिल निघून गेले.दरवेळेस
नीलाचे वडिल आजीला
खर्चासाठी पैसे देत
असत.त्या दिवशी
आजीने नीलाला जवळ
बोलावले व म्हणाल्या
तुझ्या बाबांनी मला पैसे
दिले आहेत हे
घे आणि बाजारात
जाऊन मला सीताफळ
आणून दे. मला सीताफळ
खाण्याची खूप इच्छा
झाली आहे.ठीक
आहे आजी देते
आणून म्हणत नीला बाजारात
गेली. पण फार
चांगली सीताफळ तिला मिळाली
नाही. ती विचार
करत होती.आजी
आपल्याशी कधीही नीट वागत
नाही की कधी
प्रेमाने जवळ घेत
नाही. आज काम
पडले की मात्र
मी आठवते. का
म्हणून मी तिच
काम करायच .तिचे
लाडके नातू आहेत
ना ? त्यांना सांगावे
.तसे ही नीलाचे
आईवडिल आजीशी किती प्रेमाने
वागत होते .पण
आजी मात्र त्यांना
मुलीच आहे म्हणून त्याच्याशी तुसडेपणाने
वागत होती. त्यामुळे
नीलाच्या मनात आजीबद्दल
आढी निर्माण झाली
होती. नीला बाजारात
गेली पण रिकाम्या
हातानेच घरी परत
आली .आजीला म्हणाली
सीताफळ नव्हती ग चांगले
बाजारात. आजी हिरमुसली
.ठीक आहे म्हणून
गप्प बसली. आपण
आजीची चांगली जिरवली
.कारण नसताना वाईट
वागणाऱ्याशी असच वागल पाहिजे
म्हणजे दुसऱ्याचे
दु:ख समजते ,असा विचार
करत च नीला
झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी
सकाळी सकाळी काकाकाकूच्या
रडण्याने नीला जागी
झाली. घरात
काय झाले? म्हणून
घाबरून उठली . पाहते
तर काय? सगळेजण
आजीच्या भोवती गोळा झाले
होते. नीलाने
काकूंना विचारले काय झाले?
तशी काकू रडत
म्हणाली तुझी आजी
आपल्याला सोडून देवाघरी निघून
गेली. डोक्यावर
कोणी तरी जोरात
फटका मारावा असा
भास नीलाला झाला. क्षणात
तिला काहीच सुचेना?तिच्या डोळ्यातून अश्रूधारा
वाहू लागल्या. कालचा प्रसंग तिच्या
डोळ्यांपुढे उभा राहिला.
काल आपण आजीशी
फारच दुष्टपणाने
वागलो,वाईट वागलो. तिच्याशी खोटं बोललो. तिची छोटीशी इच्छा सुध्दा आपण पूर्ण करू शकलो नाही. अशी कशी दुर्बुध्दी परमेश्वराने आपल्याला दिली .नीलाला अपराधी असल्याची जाणीव झाली. आजीची शेवटची इच्छा आपण मुद्दाम पूर्ण केली नाही याची खंत तिला वाटत होती. आईवडिल आले तशी नीला धावतच जाऊन वडिलांच्या गळ्यात पडली .त्यांना मिठी मारून खूप रडली .वडिलांनी तिला प्रेमाने जवळ घेतले , प्रेमाने समजून सांगितले.
वागलो,वाईट वागलो. तिच्याशी खोटं बोललो. तिची छोटीशी इच्छा सुध्दा आपण पूर्ण करू शकलो नाही. अशी कशी दुर्बुध्दी परमेश्वराने आपल्याला दिली .नीलाला अपराधी असल्याची जाणीव झाली. आजीची शेवटची इच्छा आपण मुद्दाम पूर्ण केली नाही याची खंत तिला वाटत होती. आईवडिल आले तशी नीला धावतच जाऊन वडिलांच्या गळ्यात पडली .त्यांना मिठी मारून खूप रडली .वडिलांनी तिला प्रेमाने जवळ घेतले , प्रेमाने समजून सांगितले.
काही दिवसांनी
ही गोष्ट तिने
आईवडिलांना सांगितली. मी अपराधी
आहे.माझ्या कडून
फार मोठी चूक
झाली आहे. आजीची
शेवटची इच्छा मी पुरी
करू शकले नाही,असे म्हणून
नीला रडू लागली.आईवडिलांनी तिला प्रेमाने
जवळ घेतले. झाली
गोष्ट विसरून जा
पण परत अशी
चूक करू नकोस,असे बजावून
सांगितले .खरे तर
आईवडिल ही मनातून
दु: खी झाले
होते. नीला लहान
होती,नासमज होती.तिला घरातील
मोठ्या माणसाकडून वाईट वागणूक
मिळाल्यामुळे तिच्याकडून अशी चूक
झाली होती. ती
मुलगी होती हा
काय तिचा दोष
नव्हता.खरे अपराधी
तर घरची मोठी
मंडळी होती. पण
शिक्षा मात्र भोगावी लागली
ती बिचाऱ्या नीलाला
.तिने तिची चूक
उजळ माथ्याने कबूल
केली.पण आपल्या
उच्च विचारसरणी असलेल्या
समाजात आपल्याच नातू,नाती
मध्ये भेदभाव करणारे
लोक त्यांची चूक सुधारतील
काय?
धन्यवाद!
सौ . प्रतिभा विभूते .
Comments
Post a Comment